कळंगुट समुद्रात दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू

0
103

पर्यटन म्हणून गोव्यात आलेल्या आणि एकत्र काम करणार्‍या सात जणांचा गट दोन दिवसांपूर्वी कळंगुट येथे आला होता. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वा. बागा समुद्रात त्यातील दोन युवक व एक युवती गेली असता त्यातील दोन युवक बुडून मरण पावले. जगजितसिंग (२४) व केशव सोनी (२७) अशी त्यांची नावे आहेत. किनार्‍यावरील जीवरक्षकांनी चित्रा दुबे हिला पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले.