पर्यटन खात्याने काल एका कारवाईत कळंगुट येथील समुद्र किनार्यावरील ८ बेकायदा शॅकवर कारवाई करून सामान जप्त केले आहे. समुद्र किनार्यावर बेकायदा शॅक सुरू असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पर्यटन खात्याकडून पावसाळ्यात शॅकना मान्यता दिली जात नाही. तसेच पर्यटन हंगाम समाप्त झाल्यानंतर शॅक बंद करण्याची सूचना केली होती. पर्यटन खात्याकडून राज्यातील विविध समुद्र किनार्यांवर गस्त घालून बेकायदा गोष्टींना आळा घातला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.