कला राखण मांडने मडगावात उद्या शुक्रवार दि. 5 जुलै रोजी संध्याकाळी 5 वा. आयोजित केलेल्या सभेत चार्लस कुरैया फाऊंडेशनशनचे वास्तुशिल्पकार कला अकादमी संकुलाच्या खालावलेल्या परिस्थितीवर सविस्तर सादरीकरण करणार आहेत. मडगावातील गोमंत विद्या निकेतनच्या फोमेंतो ॲम्फिथेिएटरमध्ये होणाऱ्या या सभेत सादरीकरणानंतर त्यावर चर्चा होईल.
चार्लस कुरैया फाऊडेशनच्या निमंत्रक व वास्तुशिल्पकार तन्वी कारिया हे सादरीकरण करणार असून 2004 मध्ये गोव्यात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून आजपर्यंत गेल्या वीस वर्षांमध्ये कला अकादमी संकुलाची कशी मोडतोड केलेली आहे यावर उजेड टाकतील.
या सभेला गोव्यातील कलाकार, तियात्रिस्ट, साहित्यिक, संगीतकार, नृत्यकलाकार, गायक, चित्रकार, लोककलाकार व सर्व कलाप्रेमी लोकांनी आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन मांडच्या सचिव सेसिल रॉड्रिगिस यांनी केले आहे.