कला अकादमीतील त्रुटी दूर करणार : गोविंद गावडे

0
12

गोवा कला अकादमीमध्ये नूतनीकरणानंतर राहिलेल्या त्रुटींबाबतची सविस्तर माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आली असून, त्रुटी दूर करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. कला अकादमीतील कुठलेही काम अर्धवट स्थितीत ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काल विधानसभेत कला व संस्कृती खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

कला अकादमीच्या विषयावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर समोर आलेल्या त्रुटींची यादी बांधकाम खात्याला सादर करण्यात आली असून, बांधकाम खात्याने त्रुटी दूर करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या दुरुस्ती कामाचा वेळेवर वाढावा घेतला जात आहे. कला अकादमीतील सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली जातील, असेही मंत्री गावडे यांनी
सांगितले.