पणजी
कला अकादमीच्या भारतीय संगीत व नृत्य विभागात विविध अभ्यासक्रमांसाठी कलेची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर प्रवेश अर्ज २०१९ च्या शैक्षणिक वर्षासाठी असतील.
या अभ्यासक्रमात भारतीय संगीतांतर्गत शास्त्रीय गायन, हार्मोनियमवादन, सतार, तबला तसेच बासरी, कथक नृत्य इत्यादी प्रकारांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा किमान १० वर्षे अशी राहील. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वयाची १० वर्षे पूर्ण केलेल्यांनीच सदर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करावेत.
इच्छुकांना प्रवेशासाठीचे अर्ज माहितीपत्रक दि. २२ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ४ पर्यंत कला अकादमीच्या लेखा विभागातून मिळवता येईल. अर्ज पूर्ण भरून जन्मदाखल्यासह दि. १६ नोव्हेंबरपर्यंत २०१८ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत अकादमीकडे देणे आवश्यक आहे. निवड चाचणी दि. २७, २८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते ५ वा. या वेळेत होणार आहे.
तसेच कला अकादमीच्या पेडणे, वाळपई, साखळी, काणकोण, केपे व सांगे येथील संगीत केंद्रात शास्त्रीय गायन, तबला व हार्मोनियम वादनाचे प्रशिक्षण दिले जाते. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी तेथील केंद्र प्रमुखांशी दि. २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१८ या कालावधीत संपर्क साधावा, प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा किमान १० वर्षे अशी राहील. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वयाची १० वर्षे पूर्ण केलेल्यांनीच सदर अभ्यसक्रमांसाठी अर्ज करावेत. सविस्तर माहितीसाठी खालील केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा.
पेडणे – तुळशीदास परब (७५८८४५४५९९), साखळी- विद्याधर पाकळे (९८२३८६६७४५), वाळपई – रामचंद्र नाईक (९९२३२३५९१०), केपे – अमित भोसले (८३९०३८६८५६), सांगे – समृद्धी थळी (९१३०५४७८२९), काणकोण – नितू महाले (८३९०२३१२३४) यांच्याशी संपर्क साधावा.