>> वरोधी पक्षनेते आलेमाव यांची माहिती
गोवा कला अकादमीच्या केलेल्या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपण सादर करणार आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पर्वरी येथे काल पत्रकार परिषदेत सांगितले.
कला अकादमीच्या इमारतीची सार्वजनिक बांधकाम खाते, कला व संस्कृती खात्याचे अधिकारी, कलाकार, स्थापत्य तज्ज्ञ, ध्वनी, प्रकाश योजनाकार यांच्यासमवेत केलेल्या पाहणीचा अनुभव भयानक आहे. कला अकादमीच्या नूतनीकरण कामाची श्वेतपत्रिका आणि न्यायालयीन चौकशीची आपली मागणी कायम आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात कला अकादमीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे, असेही युरी आलेमाव यांनी सांगितले.
कला अकादमीतील नवीन ध्वनियंत्रणा कालबाह्य आणि सुमार दर्जाची आहे, अशी टीकाआंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी अभियंता रॉजर ड्रेंगो यांनी पाहणी केल्यानंतर काल केली.