कला अकादमीच्या नूतनीकरणात घोटाळा नाही

0
18

>> मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळला

गोवा कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आणदार विजय सरदेसाई यांनी केलेला आरोप फेटाळला. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर काल केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, सरकारी अधिकार्‍यांसमवेत कला अकादमी इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाची काल प्रत्यक्ष पाहणी केली.

अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत काहीजणांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. अकादमीच्या नूतनीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. इफ्फीसाठी कला अकादमीचा काही भाग खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच ८ डिसेंबरपूर्वी कला अकादमीचे मुख्य सभागृह खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

६६ कोटी रुपयांचा घोटाळा ः सरदेसाई

>> गोविंद गावडेंच्या राजीनाम्याची मागणी

गोवा कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणप्रकरणी आता नवीन माहिती उजेडात आली आहे. इमारत नूतनीकरणाच्या कामासाठी आणखी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अंदाजे ४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणावर आता एकूण ६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून गैरव्यवहाराला आळा घालावा. तसेच, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केली.

कला अकादमीच्या नइमारत ूतनीकरणाचे काम नामांकन तत्त्वावर कंत्राटदाराला देण्याचा निर्णय कला आणि संस्कृती मंत्री गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा आमदार सरदेसाई यांनी केला.