कलम 370 ही सुरुवातीपासूनच तात्पुरती तरतूद होती. संविधान रचणाऱ्यांनी अतिशय जाणकारपणे ती संविधानात ठेवली होती. घटनेतील ही तरतूद कायम अस्तित्वात नसावी, अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. जेव्हा कलम 370 तयार करण्यात आले तेव्हा ते तात्पुरते असल्याचे नमूद करण्यात आले होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. दिल्लीत लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंगच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.