कलम 370 पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर

0
47

जम्मू-काश्मीर विधानसभेने राज्याचा विशेष दर्जा (कलम 370) पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी हा प्रस्ताव मांडला. मात्र, भाजप आमदारांनी याला विरोध करत प्रस्तावाच्या प्रती फाडल्या. आमदार वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करत राहिले. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी सदर प्रस्ताव मांडला. सभापतींनी मंत्र्यांची बैठक बोलावून स्वत: ठरावाचा मसुदा तयार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले. भाजप अध्यक्ष सत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपल्या कार्यालयात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांच्या पुतळ्यांचेही दहन केले. नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरमधील लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपने केला असून कोणतीही विधानसभा कलम 370 आणि 35- परत आणू शकत नाही असे सांगितले.