कर्र्नाटक निवडणूक आयोगाने मागितले मतचोरीचे पुरावे

0
0

राहुल गांधी यांना पाठवली नोटीस

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत.
दि. 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता. काल रविवारी काँग्रेस नेत्याला पाठवलेल्या पत्रात, सीईओने लिहिले की, राहुल यांनी सादरीकरणात दाखवलेले कागदपत्रे आणि स्क्रीनशॉट निवडणूक आयोगाच्या नोंदींशी जुळत नाहीत. चौकशीत असेही समोर आले की, ज्या महिलेवर दोनदा मतदान केल्याचा आरोप होता तिने स्वतः ते आरोप नाकारले आहेत. सीईओंनी राहुल यांना त्यांनी ज्या आधारावर हे आरोप केले आहेत ते सर्व कागदपत्रे देण्यास सांगितले जेणेकरून सविस्तर चौकशी करता येईल.
पत्रात काय लिहिले?
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रात, शकुन राणी या महिला मतदाराने दोनदा मतदान केल्याचा राहुल गांधी यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले होते.

…. राहुल गांधींचा 1 लाख मते
बनावट असल्याचा आरोप

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी एका प्रेझेंटेशनमध्ये कर्नाटक विधानसभेत 1 लाख बनावट मते असल्याचा आरोप केला. यादरम्यान त्यांनी सांगितले की, एका महिलेने 2 मते टाकली आहेत. त्यानंतर 8 ऑॅगस्ट रोजी निवडणूक आयोगाने म्हटले की जर राहुल यांचे दावे खरे असतील तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करावी. निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मत चोरीचे दावे खरे वाटत असतील, तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. जर त्यांना त्यांच्या दाव्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी देशाची माफी मागावी. कर्नाटकातील बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे आयोजित ‘मतदान हक्क रॅली’ दरम्यान राहुल गांधी यांनी, मी संसदेत संविधानाची शपथ घेतल्याचे सांगितले होते.