कर्मचारी कल्याण निधी घोटाळा, चौकशीस मान्यता

0
257

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामगार खात्याच्या इमारत बांधकाम कर्मचारी कल्याण निधी कथित घोटाळा प्रकरणाची चौकशी भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून (एसीबी) करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोवा लोकायुक्तांकडे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी कामगार खात्याच्या इमारत बांधकाम कर्मचारी कल्याण निधीत घोटाळ्याची तक्रार केली होती. लोकायुक्तांनी या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून चौकशी करण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मजूर घोटाळाप्रकरणी एसीबीकडून चौकशीबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी इमारत बांधकाम कामगार कल्याण निधी वितरणाची फाईल प्राथमिक तपासणीसाठी मागून घेतली होती.