कर्नाटकात सरकार स्थापनेच्या प्रयत्नांचे शहांकडून समर्थन

0
117

कर्नाटकात भाजपने सरकार स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार समर्थन केले. भाजपने तसा प्रयत्न केला नसता तर ते जनादेशाविरोधी ठरले असते, अशी प्रतिक्रिया शहा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गोवा व मणीपूर या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरूनही कॉंग्रेसला तेथे सरकार स्थापन करण्याची संधी देण्यात आली नाही हा दावाही शहा यांनी फेटाळला. ते म्हणाले, ‘मणीपूरचे उदाहरण पुन्हा पुन्हा दिले जाते. मला स्पष्ट करायचे आहे की आम्ही सरकार स्थापनेचा दावा प्रथम केला. गोव्याच्या बाबतीतही तसेच घडले होते. कॉंग्रेसने दोन्ही राज्यांमध्ये सरकार स्थापनेचा दावा प्रथम केला नाही आणि सर्वाधिक जागा असलेला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून सरकार स्थापनेचा दावा प्रथम केल्याने राज्यपालांनी भाजपला निमंत्रित केले.’
या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात यावेळी कॉंग्रेस ७८ जागांसह दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला व त्यांनी जेडीएसच्या सहाय्याने राज्यपालांकडे तातडीने जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र तेथे राज्यपालांनी कॉंग्रेस – जेडीएसला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले नाही. नंतर दावा केलेल्या भाजपच्या येडीयुरप्पा यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले.