कर्नाटकात निवासी शाळेत ३२ मुलांना कोरोनाची बाधा

0
27

कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते १२ वीच्या वर्गातील आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात ही घटना घडली आहे.

शाळेतील १० विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणे जाणवत असून २२ विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. एका कर्मचार्‍यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. या कर्मचार्‍याला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. दरम्यान या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शाळेत एकूण २७० विद्यार्थी असून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.