कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी काल संध्याकाळपर्यंत सभापतींसमोर हजर राहावे तसेच राजीनाम्याबाबत सभापती के. आर. रमेश कुमार यांनी त्वरित निर्णय घ्यावा असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बंडखोर आमदारांनी पोलीस सुरक्षा द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कर्नाटकातील सर्व बंडखोर आमदार काल संध्याकाळी ६ वाजता विधानसभा अध्यक्षांना भेटले. त्यांनी पुन्हा योग्य नमुन्यात विधानसभा अध्यक्षांना राजीनामे सादर केले. त्यांनी राजीनामा सादर करून ते स्वीकारण्याचा हट्ट धरला. मात्र, सभापतींनी आपण तसे करू शकत नाही. आपल्याला ते तपासून पाहावे लागतील. उच्च न्यायालयाला आपण तसे कळविले असल्याचे सांगितले.