कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. कर्नाटक सरकारने शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जारी केले असून त्या अंतर्गत महिलांना मोफत प्रवास सुरू झाला आहे. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने 11 जूनपासून राज्यात नवा नियम लागू केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांच्या बस प्रवासासाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना राज्या अंतर्गत 20 किमीपर्यंत प्रवास मोफत असेल. काँग्रेसने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यासह पाच आश्वासने दिली होती. महिलांना राज्यांतर्गत फक्त 20 किमीपर्यंतच मोफत प्रवास करता येईल. महिलांसह तृतीय पंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.