कर्नाटकमध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस?

0
26

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री एम. सिद्धारामय्या यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपकडून काँग्रेसच्या 50 आमदारांना 50-50 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आमदारांच्या खरेदीसाठी पैसे कुठून येतात, हे पैसे येडियुरप्पा, बोम्मई यांनी छापलेत का? हे ते पैसे आहेत, ज्याद्वारे राज्याला लुटण्यात आले, असेही सिद्धारामय्या म्हणाले. ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि राज्यपालांचा दुरुपयोग करुन भाजप आमच्याविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.