माजी मुख्यमंत्री, जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांचा दावा
महाराष्ट्रात सध्या जशी राजकीय परिस्थिती आहे, तशीच स्थिती कर्नाटकमध्ये तयार होणार असल्याचा दावा कर्नाटक माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी काल केला. कर्नाटकमध्येही एक ‘अजित पवार’ आहे आणि या वर्षाअखेरीस कर्नाटकमध्येही महाराष्ट्रसारखी राजकीय परिस्थिती असेल, असा दावा कुमारस्वामी यांनी काल केला.
या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी सूचक भाष्य केले. 2019 मध्ये माझे सरकार कोसळेल, असे कुणाला वाटले होते. महाराष्ट्रातही असेच झाले, असे कुमारस्वामी म्हणाले. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय हालचाली धक्कादायक आहेत. कर्नाटकमध्ये एखादा अजित पवार तयार होईल, अशी भीती आहे. कर्नाटकमध्ये असे घडायला जास्त वेळ लागणार नाही. वर्षभराच्या आतमध्ये काँग्रेस सरकार कोसळू शकते. कर्नाटकमध्ये अजित पवार कोण होणार? हे मी आता सांगणार नाही. पण हे लवकर होणार, असे कुमारस्वामी
म्हणाले.