कर्नाटकच्या साक्षीदाराला लवादाने पुन्हा धरले धारेवर ः म्हादई

0
75

म्हादई प्रश्‍नी गोव्याच्या टिमने कर्नाटकाच्या साक्षीदाराला काल पुन्हा सुनावणी दरम्यान घेरताना पाण्याच्या उपलब्धतेच्या अहवालावरून बरेच फैलावर घेतले.
गोव्याचे साथीदार चेतन पंडित यांनी पावसाचा तपशील तयार केला होता. त्या अनुषंगाने कर्नाटकाच्या साक्षीदाराने तो पडताळून न पाहताच आपला अहवाल सादर केल्याने लवादाने फैलावर घेतले.
केंद्रीय जलआयोगाचा अहवाल व २०१७ मे मधील अहवालातील आकडेवारीत बरीच तफावत व चुका आढळल्या असून त्यांना नव्याने अहवाल सादर करण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल लवादाने उपस्थित केला. मात्र या प्रश्‍नी साक्षीदाराने आपण कर्नाटकाच्या कायदा टिमशी चर्चा केली नसल्याचे कबुल केले. सुनावणी आज पुढे चालू राहणार आहे.
आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लंवदे व सर्व सहकारी आजच्या सुनावणीत सहभागी झाले होते.