कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी रुग्णालयात

0
15

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी बंगळुरूमध्ये भाजप-जेडीएस नेत्यांच्या बैठकीनंतर कुमारस्वामी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांचा शर्ट अचानक रक्ताने माखला. कुमारस्वामी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक झाली. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाजप आणि जेडीएसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अनेक घोटाळ्यांमध्ये काँग्रेस सरकारने अनुसूचित जमाती समाजाच्या कल्याणासाठी असलेला पैसा लुटला आहे, असा आरोप विरोधकांकडून होत असून यामुळे भाजप आणि जेडीएस 3 ऑगस्टला पदयात्रा काढणार आहेत. दोन्ही पक्षांनी 3 ऑगस्टपासून ‘पदयात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होणार असून पदयात्रा 3 ऑगस्टला सुरू होऊन 10 ऑगस्टला संपणार आहे.