कर्नाटककडून कळसा प्रकल्पासाठी माती परीक्षण व सर्व्हेचे काम सुरू

0
27

चार वर्षांनंतर कर्नाटकाने पुन्हा कळसा प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. म्हादई अभयारण्याच्या परिघात नाती परीक्षण तसच इतर सर्व्हे व चाचपणीला गती दिली आहे.

हलतरा व कळसा नाल्याचे पाणी वळवण्यासाठी माती परीक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. पर्यावरण कार्यकर्ते प्रा. राजेंद्र केरकर यांनी या भागाला भेट दिली असता ही बाब निदर्शनास आली.

२००६पासून कर्नाटक निरावरी निगमतर्फे हे काम सुरू करण्यात येऊन मलप्रभेत पाणी वळवण्यात आले आहे. सध्या मशिनरी आणून या मातीचे परीक्षण सुरू केले आहे. हे सर्व्हे काम पूर्ण होताच सर्व नाल्यांचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी हालचाली सुरू करण्यात येणार आहेत. सध्या गोव्याच्या सीमेलगत पाचशे मीटर परिसरात हे माती परीक्षण व सर्व्हे सुरू असल्याचे प्रा. केरकर यांनी सांगितले.

पाण्याच्या वाट्या संदर्भात गोवा,कर्नाटक व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांनी लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण अनिर्णित आहे.