कपिल झवेरीच्या जामिनावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी

0
131

वागातोर येथील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी कपिल झवेरी याने जामिनासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर येत्या २० ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने वागातोर येथील रेव्ह पार्टीवर शनिवारी रात्री छापा घालून अनेक जणांना अटक करून ९ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी तीन विदेशी महिलांसह कपिल झवेरी याला अटक करण्यात आली होती. कपिल झवेरी याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. न्यायालयाने कपिल झवेरी याच्या जामीन अर्ज प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाला बाजू मांडण्याची सूचना केली आहे.