कन्नड रक्षण वेदिकेचा आता बेळगावात धुडगूस

0
112

येळ्‌ळूरमधील परिस्थिती तणावपूर्व
येळ्‌ळूरमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या लाठीमारानंतर निर्माण झालेल्या राजकीय सामाजिक पार्श्‍वभूमीवर आता कन्नड रक्षण वेदिका या संघटनेचे हजारो कार्यकर्ते बेळगावात दाखल झाले आहेत. त्यांचा धुडगूस सुरू झाल्याचे वृत्त असून त्यामुळे येळ्‌ळूर येथेही परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
बेळगाव व येळ्‌ळूर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच खबरदारी म्हणून कन्नड रक्षण वेदिकाचे अध्यक्ष नारायण गौडा यांना अटक करण्यात आली आहे.
कर्नाटक पोलिसांनी येळ्‌ळूरमधील मराठी भाषिकांवर केलेल्या लाठीमाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शुक्रवारी शिवसेना नेते दिवाकर रावते यांना बेळगावात पत्रकार परिषद घेण्यास पोलिसांनी विरोध केला. तसेच त्यांना शहराबाहेर घालवण्यात आले. आता कन्नडिगांनी बेळगावात धुडगूस सुरू केला आहे. अनेक ठिकाणी पोस्टर्स लावून मराठी भाषकांना विरोध करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या पक्षाचे खासदार या प्रश्‍नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.