वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी कदंब महामंडळाच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन काल दिले. कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 19 मार्चपासून संपावर जाण्याची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर माविन गुदिन्हो यांनी कदंब कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची चर्चा करून त्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याची ग्वाही दिली. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, नवीन ईव्ही नोकरीच्या संधी, 20 टक्के महसूल वाढ, कामगार कल्याण सुधारणा अशी आश्वासने देण्यात आली आहेत. यावेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फॉन्सेका यांची उपस्थिती होती.