कदंब कर्मचार्‍यांना थकबाकीचे चार पैकी दोन हप्ते फेडले

0
105

काम पाहून उर्वरित हप्ते देणार
कदंब महामंडळाच्या कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे दोन हप्ते काल फेडण्यात आल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यांनी दिली.
कर्मचार्‍यांच्या थकबाकीचे आणखी दोन हप्ते शिल्लक आहेत. मात्र, कर्मचारी कसे काम करतात ते पाहूनच त्यांना पुढील दोन हप्ते कधी द्यायचे त्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले. कर्मचार्‍यांना थकबाकी वितरित करण्यासाठीचा ५.६ कोटी रु. चा निधी काल खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे ही थकबाकी काल कर्मचार्‍यांना मिळू शकल्याचे आल्मेदा म्हणाले.
दरम्यान, कर्मचारी कसे काम करतात हे पाहण्यासाठी वाहतूक सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हेही या समितीवर आहेत. कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करताना महामंडळ व कर्मचारी यांच्यात एक समझोता करार करण्यात आला होता. त्या करारात कर्मचारी कसे काम करतात. ते समाधानकारक काम करतात की नाही हे पाहण्यासाठी समिती स्थापन केली होती असे आल्मेदा म्हणाले.