कदंब कर्मचारी संघटनेकडून बेमुदत संपाची नोटीस

0
87
कदंब वाहतूक महामंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या काल झालेल्या सभेस उपस्थित कर्मचारी

कदंब वाहतूक महामंडळाच्या कर्मचारी संघटनेने काल आपल्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या दि. २८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देणारी नोटीस महामंडळाला पाठविली आहे.
सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, सहा वर्षांचा थकीत बोनस, सुवर्ण महोत्सवी बोनस अशा मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी काल कदंब कर्मचारी संघटनेची सभा येथे घेण्यात येऊन त्यावेळी वरील निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती संघटनेने दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. वरील सर्व रक्कम २७ ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास २८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या मागण्यांची पूर्तता करणे शक्य व्हावे यासाठी महामंडळाला तातडीने योग्य निधी मंजूर करावा असे आवाहन कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केले असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
कालच्या सभेवेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ऍड्. सुहास नाईक, जोकिम फर्नांडिस, गजानन नाईक, के. डी. नाईक व सुंदर जल्मी यांनी मार्गदर्शन केले.