गोव्यातील २०१६ मधील ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झालेल्या कथित अन्न घोटाळ्यासंबंधीचा तपशीलवार चौकशी अहवाल काल गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केला.
न्यायमूर्ती नितीन जामदर व पृथ्वीराज चौहान यांच्या खंडपीठाने हा अहवाल पुढील चौकशीसाठी गोवा मानवी हक्क आयोगाकडे पाठवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यानी चौकशी केली होती.