येथील आझाद मैदानावर बुधवारपासून मानधन वाढ आणि सेवेत नियमित करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करणार्या कंत्राटी शिक्षकांना विविध राजकीय पक्षा़ंकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.
हे कंत्राटी शिक्षक गेली पंधरा वर्षे सरकारी विद्यालयात कंत्राटी पातळीवर सेवा बजावत आहेत. त्यांना महिन्याला मानधन दिले जाते. सदर मानधन तुटपुंजे असल्याची तक्रार निदर्शने करणार्या शिक्षकांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कंत्राटी शिक्षकांची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
तथापि, दोन वर्षात ही समस्या सोडविली नाही, असे गंगाराम लांबोर यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, तृणमूल कॉँग्रेस पक्ष, कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी निदर्शनेे करणार्या कंत्राटी शिक्षकांची भेट घेऊन समर्थन दिले.