देशातील औष्णीक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळसा साठ्याची स्थिती अत्यंत नाजूक बनली असून देशातील अर्ध्या केंद्रांवर आठवडाभर पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय वीज अधिकारीणिच्या आकडेवारीनुसार देशातील ११ वीज केंद्रामधील कोळसा साठा संपला आहे तर ३३ केंद्रामध्ये तो चार दिवस पुरेल इतकाच आहे, ५६ केंद्रांत आठवड्याभराचा साठा शिल्लक राहिला आहे.
कोळशाची सर्वाधिक कमतरता नॅशनल पावर थर्मल कॉर्पोरेशनच्या देशातील आघाडीच्या वीज निर्मिती केंद्राना आहे. कोल इंडियाकडून कोळशाचे वितरण घटल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
वरील आकडेवारी २९ सप्टेंबर रोजीच्या स्थितीवर आधारित आहे.
दरम्यान, कोळसा मंत्रालयाने या परिस्थितीची गंभीर दखल घेताना सरकार तातडीने यावर तोडगा काढणार असल्याचे सांगितले.