औषधांच्या खोक्यांतून नेताना 82 लाखांचे मद्य पुण्यात जप्त

0
20

गोव्याहून पुण्याला औषधांच्या खोक्यांमधून नेलेले 82 लाख रुपयांचे मद्य महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्याजवळील खेड-शिवापूर तपासणी नाक्यावर जप्त केले. या प्रकरणी वाहनचालक देवीलालजी नट (32 वर्षे, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील नवीन वर्ष पार्टीसाठी हे मद्य नेण्यात येत असल्याचा आरोप आहे. ट्रक आणि मद्यांचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूरजवळ एक ट्रक थांबवून तपासणी केली. या तपासणीमध्ये औषधांच्या खोक्यांमध्ये तब्बल 82 लाख रुपये किमतीच्या मद्यांच्या बाटल्या सापडल्या. गोव्यातील मद्याची परराज्यात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत.