गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना एका मालगाडीने चिरडल्याने औरंगाबादमध्ये १६ मजूर जागीच ठार झाले. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत तिघांचे प्राण वाचले आहेत. बदनापूर-करमाड दरम्यान काल शुक्रवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. सर्व १९ मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मध्येप्रदेशात जाण्यासाठी भुसावळ येथे रेल्वे मिळेल अशी माहिती त्यांना मिळाली व त्यानुसार ते पायी पोलिसांना चुकवत भुसावळला रुळांवरून चालले होते. रात्र झाल्यामुळे रेल्वे रुळावरच झोपी गेले आणि पहाटे मालगाडीखाली चिरडले गेले.