औद्योगिक विकासासाठी राज्यात रस्ते, रेल्वेचे जाळे : उद्योगमंत्री

0
84

औद्योगिक विकासासाठी राज्यात रस्ते व रेल्वेचे जाळे उभारण्यात येणार आहे. वेर्णे येथे कंटेनर स्थानक उभारण्यात येणार आहे. तसेच बंदर आणि जलमार्गासाठी विकास करण्यात येणार आहे, असे उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी काल खात्यावरील मागण्यांवर बोलताना सांगितले.
नव्या गुंतवणूक धोरणाखाली राज्यात ज्ञानाधिष्ठित उद्योग, वित्त सेवा उद्योग, औषधे व जैवतंत्रज्ञान उद्योग, विमान तंत्रज्ञान उद्योग, कृषी उद्योग व अन्न प्रक्रिया उद्योग असे उद्योग अशा उद्योगांवर खास भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
राज्यात उद्योग स्थापन करण्यासाठी जेवढ्या जमिनी उपलब्ध आहेत त्या सर्व जमिनींची येत्या दोन महिन्यांत जाहिरात करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी पुढे सांगितले. औद्योगिक वसाहतींच्या हस्तांतरणाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
गोव्याला छत्तीसगढ येथील कोळसा ब्लॉक मिळालेला आहे तेथे प्रत्यक्ष काम सुरू करता यावे यासाठीचे काम चालू आहे. तेथे मिळणार्‍या कोळशातून राज्याला वीज मिळेल. ही वीज मिळाल्यानंतर उद्योगांसाठी जेवढी वीज हवी आहे ती मिळू शकेल, असे ते म्हणाले.