औद्योगिक भूखंडांसाठी अर्जांची महिनाभरात छाननी

0
81

गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे भूखंड मिळविण्यासाठी आलेल्या अर्जांची महिनाभरात छाननी करण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या प्रश्‍नावर दिली. नवे गुंतवणूक धोरण राबविण्यासाठी नवीन कर्मचारी भरती करण्याचा सध्या तरी प्रस्ताव नाही. महामंडळाकडे असलेल्या कर्मचार्‍यांचाच सध्या या कामासाठी वापर करणार, असेही नाईक यांनी सांगितले.