ओसीआय कार्डधारकांना थोडा दिलासा

0
5

पोर्तुगीज राष्ट्रीयत्व कायद्यानुसार पोर्तुगीज नागरिकत्व मिळालेल्या गोवा, दमण आणि दीवच्या नागरिकांना भारतीय व्हिसा/एक्झिट परमिशन किंवा ओसीआय कार्ड मिळवण्यात येणाऱ्या अडचणी केंद्रीय गृहमंत्रालयाने विचारात घेतल्या आहेत. परिणामी ओसीआय कार्डधारकांना आता थोडा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मान्यतेने असा निर्णय घेण्यात आला आहे की, पूर्वीच्या पोर्तुगीज कब्जाखालील प्रदेशातील (गोवा, दमण आणि दीव) भारतीय नागरिकांनी पोर्तुगीज राष्ट्रीयत्व कायद्यानुसार पोर्तुगीज नागरिकत्व मिळवले असेल आणि ज्यांना शरणागती प्रमाणपत्राऐवजी प्रादेशिक पारपत्र अधिकाऱ्याने पारपत्र रद्दबातल आदेश जारी केला असेल अशा आदेशाची प्रत आता त्या व्यक्तीच्या वैध पोर्तुगीज पारपत्र किंवा ओसीआय कार्डवर व्हिसा/एक्झिट परमिशन देण्यासाठी शरणागती प्रमाणपत्राच्या जागी पर्यायी कागदपत्र मानले जाईल. ही तरतूद त्या व्यक्तीसाठी लागू असेल, ज्या व्यक्तीने अयोग्य पद्धतीने पोर्तुगीज पारपत्र मिळवले नसल्याचे प्रमाणित केले आहे.