हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष सीबीआय न्यायाधीश विकास धुल यांनी त्यांना ५० लाखांचा दंड देखील ठोठावला आहे.
२००६ मध्ये सीबीआयने चौटाला यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यांच्यावर १९९३ ते २००६ दरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. १६ वर्षांच्या खटल्यानंतर, २१ मे रोजी त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत २.८१ कोटी रुपयांची मालमत्ता अधिक मिळवल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.
शिक्षेसह चौटाला यांच्या ४ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर दंड महसूलात जमा केला जाणार आहे.