ओमचा अनिलकुमारला धक्का

0
86

पणजी (क्री.प्र.)
पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या दिवशीदेखील धक्कादायक निकालांची मालिका सुरूच राहिली. ओम बर्डे याने केरळच्या माजी राज्य विजेत्या अनिलकुमार ओटी याला धक्का देत आपल्या खात्यात १३८ इलो गुण जमा केले. त्याचे एकूण ४.५ गुण आहेत. आयएम सयंतन दास व आयएम अनुप देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्सना काल धूळ चारली. सयंतन याने आमोनातोव फारुख याला तर अनुपने झियाऊर रहमानला पराजित केले. गोमंतकीय खेळाडूंमध्ये फिडे मास्टर नितीश बेलुरकर, फिडे मास्टर अमेय अवदी यांनी आपली घोडदौड सुरूच ठेवली. त्यांनी आपल्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गुण विभागून घेतला. रित्विज परब याने प्रदीप तिवारीला हरवून आपली गुणसंख्या ५.५ केली. अमेयने पराभवाच्या दाढेतून बरोबरी साधली. त्याने फिडे मास्टर विनय कुमार मट्टा याच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावला. गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी हिला थागा शरीफने बरोबरीत रोखले. तन्वी हडकोणकर, ऐश्‍वर्या थोरात यांनी विजय मिळविले.