ओपा पाणी प्रक्रिया यंत्रणेत बिघाड झाल्याने काल सकाळपासून पणजीसह तिसवाडी तालुक्याच्या अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्राहकांना त्रास झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयावरही त्याचा बराच परिणाम झाला. पाण्याअभावी गोमेकॉतील कारभार ठप्प झाला. काही दिवसांपूर्वी विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने, शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्याची पाळी डॉक्टरांवर आली होती. ओपा येथे फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले होते.