ओडिशा पुरातील बळींची संख्या ४५ : स्थिती अजून बिकट

0
155
ओडिशातील २३ जिल्ह्यांमधील शेकडो खेडी गेल्या काही दिवसांपासून जलमय बनली आहेत. अशाच एका खेडयातील लोकांना वाहनातून अन्यत्र हलविण्यात येत असताना.

ओडिशामधील प्रलयंकारी पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ४५ झाली असून पुराचा ३३ लाख लोकांना जबर फटका बसला आहे. राज्याच्या २३ जिल्ह्यांमधील स्थिती या महापुरामुळे बिकट बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंडियाकेटा खेड्यातील घरे अर्धीअधिक पाण्याखाली गेली असून अनेकजण छप्परांवर अडकले आहेत. सरकारतर्फे या खेड्यातील लोकांच्या स्थलांतराची सुविधा अद्याप झालेली नाही असे सांगण्यात आले. राज्यभरातील सुमारे ५३०० खेडी पुराच्या पाण्यात सापडली आहेत.