सध्या अंदमान समुद्रात घोंघावणारे ‘हुडहूड’ चक्रीवादळ येत्या १२ पर्यंत आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकणार असल्याचा अंदाज येथील हवामान खात्याने वर्तविला आहे.
या किनारी प्रदेशांना चक्रीवादळ धडकण्यावेळी त्याचा वेग ताशी १२० ते १४० कि.मी. एवढा असेल अशी माहिती भुवनेश्वर येथील भारतीय वेधशाळेचे संचालक सी. साहू यांनी दिली. सद्यस्थितीत या वादळाचा वेग ताशी १० ते १५ कि.मी. एवढा असल्याचे त्यांनी सांगितले. ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळपासून ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. संभाव्य वादळाची तीव्रता वाढविण्यासाठी समुद्री तापमानासह हवामानाची स्थिती पोषक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजीच विनाशकारी फैलान चक्रीवादळाने ओडिशात थैमान घातले होते.