कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसर्या लाटेचा संभाव्या धोका निर्माण झाला आहे. आता ओडिशामध्ये एकाच दिवसात १३८ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना आकडेवारी जारी केली. त्यात १ हजार ५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात १३८ मुलांचा समावेश आहे. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर १.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे.