ऑस्ट्रियामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; ३ मृत्यू, अनेक जखमी

0
131

ऑस्ट्रियाचा राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री हा हल्ला झाला. मृत्यू पावलेल्यांत एका हल्लेखोराचाही समावेश आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी एका संशयिताला ठार केले. अनेक संशयितांकडून रायफल्सच्या साहाय्याने सहा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला जात होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार होण्यास सुरुवात झाली. कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रिया पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत असतानाच हा गोळीबार झाला. लॉकडाऊन लागू होणार असल्याने बार आणि रेस्टॉरंटमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला.

फ्रान्सकडून मालीमध्ये
५० दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, फ्रान्स एअर फोर्सने पश्‍चिम आफ्रिकेतील मध्य मालीमध्ये एअर स्ट्राइक करत अल-कायदाशी संबंधित ५० दहशतवाद्यांचा खात्मा केला. मालीच्या सीमा भागामध्ये फ्रेंच हवाई दलाने दोन मिराज आणि एक ड्रोन विमान पाठवत ही कारवाई केली.