ऑरेंज अलर्ट : आजही जोरदार पाऊस बरसणार

0
4

आठवडाभरापासून पावसाचा कहर सुरू असून, राज्याला जोरदार पावसाने काल पुन्हा एकदा झोडपून काढले. पावसाचा हा जोर गुरुवारी देखील कायम राहणार आहे. कारण काल हवामान विभागाने गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सुरुवातीला हवामान विभागाने जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर बुधवार आणि गुरुवारसाठी रेड अलर्ट जारी केला होता; मात्र त्यात बदल केला आहे.

गेल्या बुधवारपासून पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. पावसाचा हा धडाका अद्यापही कायम असून, पुढील काही दिवस देखील पाऊस अविश्रांत बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात मागील आठ दिवसांत 24.82 इंच पावसाची नोंद झाली आहे. मोसमी पाऊस उशिराने दाखल होऊन सुध्दा राज्यातील पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत 29.7 टक्के जास्त आहे. राज्यातील पावसाची इंचाच्या शतकाकडे वाटचाल सुरू झाली असून, आत्तापर्यंत 92.16 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासांत 3.16 इंच पावसाची नोंद झाली आहे.