ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात 39 इंच पावसाची नोंद

0
7

>> आतापर्यंत एकूण 155.27 इंच पाऊस

राज्यात ऑगस्ट महिन्यात 39 इंच पावसाची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत 155.27 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पावसाचे प्रमाण आतापर्यंत 45.7 टक्के जास्त आहे.

वाळपई येथे पाऊस इंचाच्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून वाळपई आत्तापर्यंत 197.85 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत कमी पावसाची नोंद दाबोळी येथे 121.47 इंच एवढी झाली आहे.

राज्यात आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात 38 इंच, जुलै महिन्यात विक्रमी 78 इंच आणि ऑगस्ट महिन्यात 39 इंच अशी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी आणि अखेरीस जोरदार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासांत 0.78 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील सर्वच विभागात पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे सर्वाधिक 1.96 इंच पावसाची नोंद झाली. मुरगाव येथे 1.05 इंच, सांगे येथे 0.98 इंच, जुना गोवा येथे 0.96 इंच, पेडणे येथे 0.92 इंच, दाबोळी येथे 0.88 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे.
येथील हवामान विभागाने 2 सप्टेंबरला पावसाची शक्यता व्यक्त केली असून पिवळा अलर्ट जारी केला आहे.

तेरापैकी सात विभागांत दिडशे इंचांपेक्षा जास्त

राज्यातील तेरा विभागांपैकी सात विभागांनी पावसाच्या 150 इंचाचा टप्पा ओलांडला आहे. या विभागांमध्ये वाळपई, पेडणे, फोंडा, जुना गोवा, साखळी, केपे आणि सांगे या विभागांचा समावेश होत आहे. या वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबरोबर झाडांच्या पडझडीमुळे घरे, वीज साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध भागात आत्तापर्यंत नोंद झालेला पाऊस – म्हापसा – 142.59 इंच, पेडणे – 159.05 इंच, फोंडा – 150.16 इंच, पणजी – 145.09 इंच, ओल्ड गोवा – 152.94 इंच, साखळी – 168.04 इंच, वाळपई – 197.85 इंच, काणकोण – 149.60 इंच, दाबोळी – 121.47 इंच, मडगाव – 144.79 इंच, मुरगाव – 136.14 इंच, केपे – 169.07 इंच, सांगे – 188.68 इंच.