ऑक्टोबरमध्ये पणजीत यंदा सर्वाधिक पाऊस

0
128

राजधानी पणजी शहरात यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यतच्या सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पणजीत २०.०४ इंच एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून १३ वर्षांपूर्वीचा म्हणजे ऑक्टोबर २००६ मध्ये पडलेल्या १५.४१ इंच पावसाच्या रिकोर्डला मागे टाकले आहे.

दरम्यान, राज्यभरात ऑक्टोबर महिन्यात २१.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी जून महिन्यातसुद्धा एवढ्या पावसाची नोंद झालेली नाही.
तेरा वर्षापूर्वी म्हणजेच वर्ष २००६ मध्ये ऑक्टोबर महिन्यात १५.४१ इंच पावसाची नोंद झाली होती. वर्ष २००९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात १५.१० इंच पावसाची नोंद झाली होती. १९८५ मध्ये १४.७० इंच, वर्ष १९२९ मध्ये १४.०४ इंच, वर्ष १९२८ मध्ये १३.९२ इंच, वर्ष १९७४ मध्ये १३.७८ इंच आणि वर्ष १९२५ मध्ये ११.८६ इंच पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.