एक्झिट पोल म्हणजे अंतिम अधिकृत निकाल नव्हे असे वक्तव्य करणारे अभिनेते सलमान खान, अभिषेक बच्चन तसेच अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या मिम्सचा अभिनेता विवेक ओबेरॉयने फोटो पेस्ट केल्याप्रकरणी त्याला महाराष्ट्राच्या तसेच केंद्रीय महिला आयोगानेही नोटीस जारी केली आहे.
याप्रकरणी विवेक ओबेरॉय याच्यावर बॉलिवूड कलाकारांसह राजकीय व्यक्तींनीही खरपूस टीका केली आहे. मात्र ओबेरॉयने आपले काही चुकले नसल्याचा दावा केला आहे. ‘लोक मला माफी मागायला सांगत आहेत. माफी मागण्यात काही अडचण नाही. पण मी काय चूक केलीय? एखाद्याने मिम्स पोस्ट केली आणि त्यावर मी हसलो म्हणजे मी चूक केली असे होते काय? असा सवाल त्याने केला आहे.
ज्या कारणासाठी मला नोटीस पाठविण्यात आली आहे त्याचे स्पष्टीकरण मी महाराष्ट्र राज्याच्या व केंद्रीय महिला आयोगाला देणार आहे.
विवेक ओबेरॉयने मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला आहे. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या सलमान खानबरोबर दिसते. त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसर्या फोटोत विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय आहे. त्याखाली एक्झिट पोल असे लिहिले आहे. नंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व अराध्या यांचा फोटो आहे व त्याखाली रिझल्ट असे लिहिले आहे.