महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह आता ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. दरम्यान अभिषेक आणि अमिताभ यांना नानावटीमध्ये भरती करण्यात आले आहे. यात अमिताभ यांच्या घराजवळील संरक्षणही वाढवण्यात आले आहे. अमिताभ यांच्या जुहू येथील दोन्ही बंगल्याच्या बाहेर अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. अमिताभ हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर अनेक चाहते इस्पितळाच्या बाहेर जमा होऊ लागले होते. मात्र त्यांना तेथून हटवण्यात येत आहे.