आणखी नावांचा शोध
काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले ‘लहान’ असोत किंवा ’मोठे’, सर्वांची चौकशी केली जाईल व अहवाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सादर केला जाईल, असे सुप्रीम कोर्टातर्फे गठीत या समितीचे अध्यक्ष न्या. एम. बी. शहा यांनी काल सांगितले.दरम्यान, विदेशातील खातेधारकांच्या नावाबाबत गोपनीयता पाळण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जीनेव्हाच्या एचएसबीसी बँकेतील खातेधारकांची जी नावे देण्यात आली आहेत, त्याव्यतिरिक्त अन्य नावे आहेत का याचा शोध समिती घेत आहे. दरम्यान, काळ्यापैशांसंबंधी पहिला अहवाल समितीने ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाला सादर केला आहे. परवा केंद्राने काळ्या पैशांसंबंधी विदेशी खातेधारकांची ६२८ नावे सरकारला सादर केली होती.