‘एलिझाबेथ एकादशी’ला विरोध करण्यासारखे काय?

0
104

दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा सवाल
‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला कुणी विरोध करावा असे त्यात काहीही नाही असे या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. विनाकारण एखाद्या गोष्टीला विरोध करणारेही लोक असतात असे सांगून त्यावर अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले.या चित्रपटाला पंढरपूरची पार्श्‍वभूमी असल्याने संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पंढरपूर येथे करण्यात आले. पंढरपूरला वारी चालू असताना तेथे चित्रीकरण करण्याचा अनुभवही खूप चांगला होता. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो पंढरपूरच्या लोकांना दाखवण्यात आल्यानंतर ते एवढे भारावून गेले की त्यांनी आपला मिरवणूक काढून गौरव केल्याचे मोकाशी म्हणाले. या एकूण चित्रपटाला एक वेगळी ट्रिटमेंट देण्याची गरज होती व ती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकादशीची पार्श्‍वभूमी चित्रपटाला असल्याने व त्या चित्रपटातील एक महत्त्वाचे असे पात्र असलेल्या सायकलीचे नाव एलिझाबेथ असल्याने चित्रपटाला ‘एलिझाबेथ एकादशी’ असे नाव दिल्याचे मोकाशी यांनी यावेळी स्पष्ट केले. या चित्रपटासाठी निवड झालेल्या बालकलाकारांनी नैसर्गिक अभिनय करावा म्हणून प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी त्यांच्यासाठी अभिनयाचे शिबिर घेतल्याचेही मोकाशी म्हणाले.
चित्रपटाचा शेवट सुखांत करण्यामागील भूमिका काय, असे विचारले असता ते म्हणाले की, कथाच तशी सुखांताची होती.