सरकारच्या ज्योतिर्गमय योजनेखाली पंचायतींमध्ये पाठविण्यात आलेल्या एलईडी बल्बांची संख्या वीज ग्राहकांच्या तुलनेने कमी असल्याने संबंधित पंचायतींच्या सरपंचांची तारांबळ उडाली आहे.
सध्या वेगवेगळ्या पंचायत कार्यालयांसमोर बल्ब घेण्यासाठी ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागत असून बल्ब कमी पडत असल्याने ग्राहक संतप्त होत असल्याचे चित्र आहे. वरील योजनेखाली सरकारने प्रत्येक कुटुंबाला ३ बल्ब वितरीत करण्याचे ठरविले आहे. परंतु बल्ब टंचाईमुळे रांगेतील ग्राहकांना रिक्त हस्ते परतण्याची पाळी येत आहे. ग्राहकांच्या संख्येचा विचार करूनच बल्बांचा पुरवठा करावा, अशी पंचायतीची मागणी आहे. एलईडी बल्बांमुळे विजेची बचत होईल याची जनतेमध्ये जागृती झाल्याने वरील योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.