येत्या दि. १५ रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (फातोर्डा) होणार्या चेन्नैयन्स एफसीविरुध्दच्या शुभारंभी आयएसएल सामन्याच्या तिकीटा गोमंतकीय फुटबॉलप्रेमींसाठी ‘ऑन-लाइन’ उपलब्ध होतील. एफसी गोवाने आपल्या आयएसएल सामन्यांच्या ऑनलाइन तिकीट विक्रीसाठी ‘बूक माय शो. कॉम’ या संकेतस्थळाशी भागिदारी केली असून स्थानिक संघ़ाच्या शुभारंभी तसेच स्वगृहीच्या अन्य सामन्याची तिकीट विक्री आता थेट संकेतस्थळावरून होईल.
भारतीय फुटबॉलमध्ये नवचैतन्य निर्मिण्याच्या हेतून सुरू करण्यात आलेल्या दी हिरो इंडियन सुपर लीगचा प्रारंभ येत्या रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
एफसी गोवा संघ आपला शुभारंभी सामना दि. १५ रोजी चेन्नईयन्स एफसीविरुध्द मडगाव येथील नेहरू स्टेंडियमवर खेळेल.
तिकीट दर रु. १०० (नॉर्थ आणि साऊथ स्टँड), रु. २०० (ईस्ट स्टँड) आणि रु. ३०० (वेस्ट स्टँड) असा असेल. कॉर्पोरेट बॉक्सेसमधील तिकीट रु. २५०० असेल. स्वगृहीच्या सामन्यांचे सीझन पासेसही उपलब्ध असतील. सर्व सहा सामन्यांच्या तिकीटा खरिदल्यास एक तिकीट मोफत मिळेल.
‘बूक माय शो’ व्यतिरिक्त कॅफे कॉफी डे, मोबाईल शाीप स्टेअर आणि निवडक व्हिडिओकॉन शोरूम्समध्येही तिकीटस मिळतील. एफसी गोवाच्या स्वगृहीच्या पहिल्या सामन्यासाठी नेहरू स्टेंडियमवरील (फातोर्डा) तिकीट काऊंटरवर दि. ९पासून तिकीट विक्री सुरू होईल.
कॅफे कॉफी डेच्या बांबोळी, कोलवा, मडगाव, पणजी, पर्वरी, कळंगुट, बागा, कांदोळी, म्हापसा आणि पाळोळे येथील आऊटलेटमध्ये १० ऑक्टोबरपासून तिकीटविक्री सुरू होईल. मोबाईल स्टेअरच्या बार्देश, पर्वरी, वास्को आणि पणजी येथील आऊलेटसमध्ये तिकीट उपलब्ध असतील.
तीन वेळा विश्व चषकात ब्राझिलचे प्रतिनिधीत्व केलेल्या विख्यात फुटबॉलपटू तथा प्रशिक्षक अर्थुर अंतुनेस कोइर्ंम्ब्रा उर्फ झिको यांना प्रशिक्षकपदी करारबध्द करून एफसी गोवाने औत्सुक्य जागविले आहे. झिको यांच्या मागर्ंदर्शनाखालील प्रशिक्षणावर खेळाडू संतुष्ट असून आयएसएलच्या शुभारंभी पर्वात चमक दर्शविण्यास उत्सुक आहेत.