एनआयसीचे सरकारला अनमोल साहाय्य

0
202

>> कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध ‘ई-सेवा’

राष्ट्रीय माहिती केंद्र गोवाने (एनआयसी) कोविड-१९ या महामारीच्या काळात राज्य सरकारच्या सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मोलाचे साहाय्य केले आहे.

एनआयसी, गोवाने कोविड महामारीच्या काळात केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांवर माहिती तंत्रज्ञानासंबंधी कोणत्याही गुंतागुंतींचा प्रभाव पडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या. कोविड महामारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त कारभार केवळ ’ई-सेवा’ पद्धतीने चालविला जात आहे. एनआयसीकडून सरकारच्या कामकाजात व्यत्यय येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या संकेतस्थळे आणि मोबाईल एप्लिकेशन्स यांना साहाय्य केले आहे. एनआयसी नागरिक केंद्रित ई-सेवा पुरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

गोव्यातील कोविड-१९ आरटी- पीसीआर चाचणी व रॅपिड ऍन्टीबॉडी चाचणी ऍप्लिकेशनसाठीच्या वेब पोर्टलला व मोबाईल ऍप्लिकेशनच्या अंमलबजावणीसाठी साहाय्य केले जात आहे. त्यामुळे कोविड चाचणी करणार्‍या व्यक्तींना मोबाईलवर चाचणी निकालाचा संदेश पाठविणे शक्य होत आहे. भारत सरकारने कोविड-१९ ची लागण होण्याचा धोका लक्षात आणून देण्यासाठी मदत म्हणून सुरू केलेल्या आरोग्य सेतू ऍप्लिकेशनचे प्रकाशन व त्याला आवश्यक साहाय्य केले जात आहे.

राज्य व जिल्हा पातळीवर स्थलांतरित कामगार नोंदणी, राज्य अन्न मदत क्रमांक स्थापित करण्यासाठी तांत्रिक साहाय्य पुरविले. राज्य सरकारच्या घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या कोविड सर्वेक्षण, आरोग्य अधिकारी व सर्वेक्षण करणारे कर्मचारी यांच्या व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर पर्याय हे एनआयसीद्वारे घेण्यात आले आहे.

व्हिडिओ परिषदांसाठी साहाय्य
मंत्रालयांसोबत उच्च स्तरीय व्हिडिओ परिषदेसाठी तांत्रिक साहाय्य, सचिवालय, उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय येथे कार्यालयीन बैठका घेण्यासाठी डेस्कटॉप आधारित व्हिडिओ परिषद उपायांसाठी तांत्रिक साहाय्य दिले आहे. गोव्यातील संकेतस्थळ आधारित प्रवास परवाने व क्यूआर कोड आधारित उद्योग परवाने देणारे ऍप्लिकेशन विकसित केले. गोवा राज्य केंद्र, जिल्हा माहिती अधिकारी उत्तर व दक्षिण गोवा, इमिग्रेशन, व्हिसा व परदेशी व्यक्ती नोंदणी व देखरेख या सर्वांसाठी घेण्यात आलेल्या व्हिडिओ परिषदांना एनआयसी अधिकार्‍यांनी दिलेले तांत्रिक साहाय्य तसेच माहिती तंत्रज्ञान केंद्रसंबंधीत उपक्रम खूप महत्त्वपूर्ण आहेत.

ऑनलाईन पास योजना
गोव्यात येणार्‍या आणि जाणार्‍यांसाठीची ऑन लाईन पास योजनेसाठी साहाय्य केले. ही पास पद्धत ऑन लाईन पद्धतीने कार्यान्वित आहे. या पास पद्धतीच्या साहाय्याने आत्तापर्यंत २५ हजारांच्या आसपास नागरिकांनी गोव्यात प्रवेश केला आहे. विमानतळ व बंदरांवरील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. यासोबत, गोव्यातून परदेशी नागरिकांना घेऊन जाणार्‍या चार्टर्ड विमानांसाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी तांत्रिक साहाय्य व्यवस्थापन उपलब्ध केले आहे.